वेगवेगळ्या एक्झिट पोल्समध्ये नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला बिहारमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली असताना, खुद्द नितीशुकमार यांनी या सर्व शक्यता फेटाळून १६ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.
एक्झिट पोल्समधील अंदाज म्हणजे तुम्ही लोकं बोलत आहात. खरा आकडा समजण्यासाठी १६ मे पर्यंत वाट पाहा, असे नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यापैकी संयुक्त जनता दल ५ जागांवरच विजय मिळवू शकेल, असे एक्झिट पोल्सनी म्हटले आहे. त्याचवेळी भाजपच्या पारड्यात २० ते २५ जागा पडण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी हे अंदाज स्वीकारण्यास नकार दिला.