07 March 2021

News Flash

अयोध्या प्रकरण: २९ जानेवारीस न्यायाधीश उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलली

दोन दिवसांपूर्वीच सरन्याधीश रंजन गोगई यांनी अयोध्याप्रकरणी सुनावणी करण्यासाठी ५ सदस्यीय नवीन घटनापीठाचे गठन केले होते.

संग्रहित छायाचित्र

सर्वोच्च न्यायालयात अयोध्याप्रकरणी २९ जानेवारी होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. दोन दिवसांपूर्वीच सरन्याधीश रंजन गोगई यांनी अयोध्याप्रकरणी सुनावणी करण्यासाठी ५ सदस्यीय नवीन घटनापीठाचे गठन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अॅडिशनल रजिस्ट्रार लिस्टिंगकडून रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिशीनुसार घटनापीठातील न्या. एस ए बोबडे हे २९ जानेवारीस उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे त्या दिवशी सुनावणी होणार नाही.

न्या. यू यू लळित यांनी स्वत:ला या खटल्यापासून वेगळे केल्यानंतर नवीन घटनापीठाची स्थापना केली होती. पूर्वीच सुनावणीची तारीख २९ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. आता ही तारीखही रद्द करण्यात आली असून आता नवीन तारीख निश्चित केली जाईल.

सरन्यायाधीश गोगाई यांनी शुक्रवारी नव्या घटनापीठाचे गठन केले होते. नव्या घटनापीठात न्या. अशोक भूषण, न्या. अब्दूल नजीर यांचा समावेश करण्यात आला होता. घटनापीठात सरन्यायाधीश स्वत:, न्या. एस ए बोबडे आणि न्या. डी वाय चंद्रचूड यांचा समावेश होता. यापूर्वी अयोध्या प्रकरणी गठीत करण्यात अलेल्या जुन्या घटनापीठातील न्या. लळित हे सुनावाणीपासून दूर झाले होते. त्यानंतर नवीन घटनापीठाचे गठन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 5:41 pm

Web Title: no ayodhya hearing in supreme court on january 29
Next Stories
1 तामिळनाडूत मोदींना विरोध, #GoBackModi ट्विटरवर ट्रेंड
2 अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपामध्ये प्रवेश
3 प्रियांका गांधी मानसिक रुग्ण, लोकांना मारहाण करतात – स्वामी
Just Now!
X