29 October 2020

News Flash

५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी देशभरातले ‘स्ट्रीट लाईट्स’ नाही होणार बंद

केंद्रीय उर्जा मंत्रालयानेच ही माहिती दिली आहे

५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करा आणि दिवा, मेणबत्ती किंवा मोबाइल टॉर्च सुरु करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी जनतेला केलं आहे. अशात पथदिव्यांना म्हणजेच स्ट्रीट लाईट्सना हा नियम लागू नसेल असं केंद्रीय उर्जा मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसंच घरातली उपकरणे, अत्यावश्यक सेवा जसे की मेडिकल, हॉस्पिटल यांनाही लाइट बंद करणे बंधनकारक नाही. रस्त्यावरचे दिवे हे जनतेच्या सुरक्षेसाठी सुरु ठेवावेच लागतील असंही उर्जा मंत्रालयाने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता देशवासीयांशी एका व्हिडीओतून संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी करोनाशी आपण कसे लढतो आहोत हे सांगितलं. शिवाय ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी प्रत्येकाने घरातले लाईट बंद करुन एक दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईल टॉर्च गॅलरी किंवा घरात लावावा असं आवाहन केलं. याआधी त्यांनी थाळ्या वाजवण्याचं, घंटानाद करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र काही लोक रस्त्यावरही उतरले होते. मात्र यावेळी ती चूक करु नका. घरातच एक दिवा पेटवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आहे त्यातून पथदिवे अर्थात स्ट्रीट लाईट्स वगळण्यात आले आहेत. सुरक्षेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 4:29 pm

Web Title: no call to switch off street lights or appliances in homes says ministry of power scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 पंतप्रधान मोदींनी वाजपेयींची ‘ती’ कविता शेअर करत केलं दिवे लावण्याचं आवाहन
2 हे वागणं बरं नव्हं! एनजीओला फोन करुन जेवण मागवणाऱ्या कुटुंबाच्या घरी सापडला धान्यसाठा
3 चीननं पाकिस्तानला पुरवले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क; चॅनेल म्हणतं ‘चुना लगा दिया’
Just Now!
X