27 February 2021

News Flash

तर तुम्हीही रिजेक्ट करु शकणार बॉसचा कॉल आणि मेल

विधेयक मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांना बॉसचे येणारे कॉल कट करणे सहज शक्य होणार

सुटीच्या दिवशी वा कार्यालयीन वेळेनंतर कामासंबंधीचे कॉल आणि ईमेलला नकार देणे सहज शक्य होणार आहे. यासंबंधीचे एक खाजगी विधेयक राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मांडले आहे. जर हे विधेयक पास झाले तर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बॉसच्या कॉल आणि मेलपासून दिलासा मिळणार आहे. या विधेयकाचे नाव ‘राईट टू डिसकनेक्ट’ असे आहे.

कामाच्या कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त कार्यालयातून येणाऱ्या कामासंबंधीच्या कॉल आणि इमेलपासून दूर राहण्याचा अधिकार द्यावा. तसेच सुटीच्या दिवशी व कामाच्या वेळेशिवाय बॉस आणि कार्यालयातून येणारे कामासंबंधी कॉल आणि ईमेल रिजेक्ट करण्याचाही अधिकार देणारी कामगार कल्याण प्राधिकरण स्थापना करावे, असे खाजगी विधेयक सुळे यांनी संसदेमध्ये मांडले आहे. संसदीय कार्यप्रणालीत मंत्रिमंडळात नसलेल्या खासदारालाही विधेयक मांडता येते.त्याला खासगी विधेयक म्हटले जाते. त्यानुसार सुप्रिया सुळे यांनी २८ डिसेंबर रोजी हे विधेयक मांडले आहे.

कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचा अधिकार देणाऱ्या देशात एकमेव फ्रान्स आहे. ‘राईट टू डिसकनेक्ट’ या काद्यानुसार कर्मचारी कामाव्यतिरिक्तच्या काळात बॉसचे फोन अथवा मेलला रिप्लाय देत नाहीत. तसा त्यांना आधिकार आहे. २००७ मध्ये फ्रान्समध्ये ‘राईट टू डिसकनेक्ट’ हे विधेयक लागू करण्यात आले आहे. जर भारतामध्येही हे  संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांना बॉसचे येणारे कॉल कट करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे नववर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 12:45 pm

Web Title: no calls and emails from boss after working hours proposes a private members bill in parliament
Next Stories
1 नग्न प्रवाशामुळे दुबई-लखनौ विमानात गोंधळ
2 वर्षाअखेरच्या ‘मन की बात’मध्ये मोदींकडून पुण्याच्या वेदांगीचे कौतुक
3 2019 निवडणुकांच्या तोंडावर पाकिस्तानला पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ची भीती
Just Now!
X