News Flash

आठवले म्हणतात, मोदी लाट सुरूच राहणार, राहुल पंतप्रधान होण्याचा प्रश्नच नाही

किमान १५ वर्षे मोदी लाट चालेल असा विश्वास व्यक्त करत मायावतींना दलितांसाठी जर काही करायचे असेल तर त्यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.

संग्रहित छायाचित्र

एकेकाळी काँग्रेसचे सहकारी राहिलेले विद्यमान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात अजूनही मोदी लाट सुरू असून पुढील १० ते १५ वर्षे ती कायम राहील. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान बनण्याचा प्रश्नच नाही, असे मत व्यक्त केले आहे.

जर २०१९ मध्ये काँग्रेसला पुरेशा जागा मिळाल्या तर मी पंतप्रधान होऊ शकतो, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आठवले यांनी समाचार घेतला. असे होणे शक्यच नाही, कारण किमान १० ते १५ वर्षे मोदी लाट चालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डेहराडून येथे माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, आगामी सर्वच निवडणुकांत मोदी लाट चालेल. कारण ते समाजातील सर्व वर्गांना बरोबर घेऊन जाण्यात विश्वास ठेवतात.

क्रिमीलेअर अंतर्गत येणाऱ्या जातींना आरक्षणामध्ये सहभागी करण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी ४९.५ टक्क्यांवरून ७५ करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मायावतींना दलितांसाठी जर काही करायचे असेल तर त्यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 9:18 am

Web Title: no chance to rahul gandhi to become a prime minister modi wave still going on says ramdas athawale
Next Stories
1 माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या २१ वर्षीय मुलाचा हृदयविकाराने मृत्यू
2 सलग दहाव्या दिवशी इंधन दरवाढ, मुंबईत पेट्रोल ८५ रुपये
3 आघाडी सरकार चालविणे हे आव्हानच
Just Now!
X