देशाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करणाऱया ‘रेटींग एजन्सी’चे मत एका बाजूला सारून अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकार आर्थिक दृढीकरणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच २०१६-१७ सालापर्यंत देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नातील (जीडीपी) तूट ३ टक्क्यांपर्यंत आणण्याचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल असा विश्वासही चिदंबरम यांनी व्यक्त केला.
चिदंबरम म्हणाले, नक्कीच आर्थिक दृढीकरण हा मुद्दा शीर्षस्थानी आहे. त्यामुळे पायरी पायरीने जीडीपी तूट कमी करण्याच्या मार्गावर सरकार चालेल यात कोणतीही तडजोड नाही. २०१६-१७ सालापर्यंत देशाचा जीडीपी ३ टक्क्यांपर्यंत आणण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे आणि नक्की पूर्ण होईल असेही ते म्हणाले.
ते दिल्लीतील आर्थिच चर्चासत्राच्या येत्या पाच वर्षातील देशाची उद्दीष्टे याविषयावर बोलत होते.
देशातील काही रेटींग एजन्सीच्या मतानुसार काँग्रेसचा सध्याच्या निवडणुकीतील झालेल्या पराजयाचा परिणामा देशाच्य जीडीपीवर होईल. आपली राजकीय उद्दष्टे पूर्ण करण्यासाठी देशाच्या आर्थिक उद्दिष्टांवर राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याचे म्हटल्यावर चिदंबरम यांनी या मताचा कडाडून विरोध केला व जीडीपी बाबतीतल्या धोरणांमध्ये कोणताही बदल केला किंवा तडजोड केली जाणार नाही असे म्हटले.