News Flash

चीनच्या दुखत्या नसेवर भारताचं बोट; व्यापारी संबंधांवर परिणाम होण्याचा दिला इशारा

गेल्या अनेक दिवसांपासून सीमेवर तणावाचं वातावरण

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या महिन्यांपासून सुरू भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेला तणाव अद्यापही कमी झालेला नाही. एकीकडे चर्चेतून याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरापती मात्र अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. “गेल्या ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या प्रकारे सीमेवर सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचे परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवरही होतील,” असा थेट इशारा भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिला.

“गेल्या काही दशकांमध्ये आपण अनेक समस्यांचा सामना करत आहोत. चीनसोबत सध्या निर्माण झालेली परिस्थितीही त्यापैकीच एक आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये जे झालं नाही ते यावेळी झालं. ४० वर्षांत त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा आपले जवान गमावले आहेत,” असं श्रृंगला म्हणाले.
देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडतेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. भारत एक जबाबदार देश आहे आणि कायमच तो चर्चेसाठी तयार आहे. जोपर्यंत सीमाक्षेत्रात शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सामान्य होऊ शकत नाही. सीमेवर जी काही परिस्थिती निर्माण होत आहे त्यानं द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. सीमेवरील परिस्थिती आणि दोन्ही देशांतील संबंध एकमेकांशी जोडले गेले असल्याचंही श्रृंगला यांनी नमूद केलं.

नरवणेंकडूनही आश्वासन

यापूर्वी लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांनीदेखील देशवासीयांना आश्वासन देत कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं. तसंच देशवासीयांनी सैन्यावर विश्वास ठेवावा असंही त्यांनी नमूद केलं. एलएससीवर परिस्थिती गंभीर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सीमेवर लष्कराची तैनाती वाढवण्यात आली आहे. तसंच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी चर्चाही सुरू असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 8:27 pm

Web Title: no compromise with the integrity of the country business relations will also be affected situation on border india warns china jud 87
Next Stories
1 SCO Summit 2020 : राजनाथ सिंह यांचा चीनवर निशाणा; म्हणाले…
2 करोना लसीसाठी सुमारे एक वर्ष वाट पाहावी लागणार : WHO
3 चीनचं सुखोई-३५ विमान पडलं का?; तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण, म्हणाले…
Just Now!
X