संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठरावामुळे शुक्रवारी मतदान होणार आहे. सध्या लोकसभा अशात विरोधी पक्षांना बोलण्यासाठी अवघ्या ३८ मिनिटांचा वेळ देण्यात आला. ज्यानंतर लोकसभेत एकच गदारोळ बघायला मिळाला. काँग्रेसने गदारोळ सुरू करतच वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार उभे राहिले आणि सध्याचा जमाना हा वनडेचा आणि टेस्ट मॅचचा नाही असे खोचक उत्तर दिले. त्याआधीच बीजेडी म्हणजे बिजू जनता दलाच्या खासदारांनी सभात्याग केला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मितहास्य करताना बघायला मिळाले.

दरम्यान विरोधी गटातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, सप या प्रमुख पक्षांची एकी कायम राहील. ‘आप’नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना तटस्थ राहिल्याचीही माहिती समोर आली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला. आता मतदानात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.