News Flash

No Confidence Motion in Lok sabha: ‘राहुल गांधी न चुकता १५ मिनिटं बोलले तर जमीन हादरेल’

जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली असून, संध्याकाळी सहा वाजता मतदान होणार आहे. तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी अविश्वास प्रस्ताव मांडत मोदी सरकावर टीका केली असून गदारोळ सुरु झाला आहे. यावेळी सर्वांचं लक्ष काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे असणार आहे. राहुल गांधी यावेळी काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी न चुकता १५ मिनिटं बोलले तर जमीन हादरेल असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘जर राहुल गांधी न वाचता, न अडखळता, न चुकता १५ मिनिटं बोलले तर नक्कीच जमीन हादरेल, नुसती हादरणार नाही तर नाचेलही’, असा टोला परेश रावल यांनी लगावला आहे.

जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असून केंद्र सरकारला धोका नसला तरी प्रादेशिक पक्ष कोणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली असून तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पुतळ्यांसाठी हजारो कोटी रुपये देण्यात येत असताना आंध्रच्या राजधानीसाठी पैसे नसल्याची व्यथा गल्ला यांनी मांडली. शिवाजी महाराजांच्या मुंबईतल्या स्मारकासह देशभरातल्या अनेक पुतळ्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की पुतळ्यांसाठी हजारो कोटींची तरतूद होते परंतु आंध्रप्रदेशच्या संपूर्ण राजधानीच्या उभारणीसाठी केवळ 1500 कोटी रुपये देण्यात येत आहेत. विजयवाडा व गुंटूरच्या भुयारी कूपनलिकांसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद आहे, मात्र नव्या राजधानीसाठी 1500 कोटींची तरतूद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

आम्हाला या वादात पडायचं नाहीय – आनंदराव अडसूळ, शिवसेना खासदार
आम्ही कुणीच आज सभागृहाच्या हजेरी पटावर स्वाक्षरी केलेली नाही. आम्हाला या वादात पडायचं नाहीय. उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका जाहीर करतील अशी माहिती आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 12:34 pm

Web Title: no confidence motion in lok sabha paresh rawal target rahul gandhi
Next Stories
1 शिवसेनेच्या लेटरहेडवर म्हणे जारी झाला खोटा व्हिप
2 No Confidence Motion in Lok sabha : आम्ही केंद्र सरकारसोबत-नितीशकुमार
3 No Confidence Motion in Lok sabha: ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापेक्षा कमी पैसे आंध्रच्या राजधानीसाठी’
Just Now!
X