28 May 2020

News Flash

मोदी जी के पास है काँग्रेस को हराने की कला, आठवलेंनी ऐकवली खास कविता

राहुल-मोदी गळाभेटीपासून ते काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीपर्यंत सर्वच गोष्टींचा आढावा घेणारी एक कविता ऑन द स्पॉट रचली

रामदास आठवलेंनी ऐकवली कविता

No Confidence Motion in Lok sabha: लोकसभेतील अविश्वास ठरावावर सकाळी अकरावाजल्यापासून सुरु असलेल्या चर्चेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपले मत नोंदवले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या खास शैलीतील कविता ऐकवून संसदेतील सर्वांची मने जिंकली. अविश्वास ठरावाला क्रिकेट सामन्याची उपमा देत आठवलेंनी संसदेत चांगलीच शाब्दिक बॅटिंग केली. आजच्या टी-२० सामन्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी चांगल्या धावा काढल्यात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे विराट कोहली आहेत. ते राहुल गांधींहून दुप्पट धावा करतील आणि हा आजचा (अविश्वास ठरावाचा) सामना जिंकण्यासाठी आम्ही त्यांना नक्कीच मदत करु असं आठवलेंनी सांगिले. आठवलेंच्या या छोट्या भाषणामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

आठवले एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आज दिवसभरात संसदेत झालेल्या राहुल-मोदी गळाभेटीपासून ते काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीपर्यंत सर्वच गोष्टींचा आढावा घेणारी एक कवितेची त्यांनी ऑन द स्पॉट रचना केली आणि ती संसदेमध्ये ऐकवली. यमक जुळवणाऱ्या या कवितेची सुरुवात त्यांनी

आज राहुल गांधीजी ने प्रधानमंत्रीजी के गले को मिलाया गला
लेकीन नरेंद्र मोदी जी के पास है काँग्रेस को हराने की कला

या दोन वाक्यांने करताच सभागृहात पुन्हा एकदा हशा पिकला. पुढे कविता पुर्ण करताना त्यांनी आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवत पुढे…

काँग्रेस ने पुरे किए थे सत्ता में ५०-५१-५५ साल
तब उन्होने कमाया है बहुतही माल

२०१४ में नरेंद्र मोदीजी ने किया था बहुत बडा कमाल
इस लिए देश मे हो रहा है विकास का धमाल

काँग्रेस का  देश मे आज ठीक नही है हाल
इसलिए नरेंद्र मोदी जितेंगे २०१९ का साल

ही तीन कडवी रचून पुढील लोकसभा निवडणुकांमध्येही मोदीच जिंकतील अशी जणून भविष्यवाणीच करुन टाकली. आठवलेंच्या या यमक साधणाऱ्या कवितेमुळे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनाही चांगलेच हसू फुटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 10:13 pm

Web Title: no confidence motion in lok sabha republican party of india leader ramdas athawales poem recitation
Next Stories
1 गौरी लंकेश हत्येप्रकरणी सातव्या संशयिताला अटक
2 २२ वर्षीय विवाहित महिलेवर ४० जणांकडून सामूहिक बलात्कार
3 दहशतवादी हल्ल्यापेक्षा खड्डे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त – सर्वोच्च न्यायालय
Just Now!
X