लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली असून तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पुतळ्यांसाठी हजारो कोटी रुपये देण्यात येत असताना आंध्रच्या राजधानीसाठी पैसे नसल्याची व्यथा गल्ला यांनी मांडली. शिवाजी महाराजांच्या मुंबईतल्या स्मारकासह देशभरातल्या अनेक पुतळ्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की पुतळ्यांसाठी हजारो कोटींची तरतूद होते परंतु आंध्रप्रदेशच्या संपूर्ण राजधानीच्या उभारणीसाठी केवळ 1500 कोटी रुपये देण्यात येत आहेत. विजयवाडा व गुंटूरच्या भुयारी कूपनलिकांसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद आहे, मात्र नव्या राजधानीसाठी 1500 कोटींची तरतूद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी गल्ला यांनी आंध्रच्या विभाजनामुळे लोकांचे दरडोई उत्पन्न घटल्याचा आरोप केला. दक्षिणेकडील अन्य राज्यांचे दरडोई उत्पन्न वाढत असताना केवळ आंध्र प्रदेशचे घटत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारने आंध प्रदेशवर अन्याय केल्याची टीका केली.

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”en” dir=”ltr”>Mr Modi while campaigning in Andhra Pradesh had said &#39;Congress killed the mother &amp; saved the child. Had I have been there, I would have saved the mother too&#39;. People of AP have waited for 4 long yrs for him to save their mother: Jayadev Galla, TDP in Lok Sabha <a href=”https://twitter.com/hashtag/NoConfidenceMotion?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#NoConfidenceMotion</a&gt; <a href=”https://t.co/S5qgU3K871″>pic.twitter.com/S5qgU3K871</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1020188958645354496?ref_src=twsrc%5Etfw”>July 20, 2018</a></blockquote>
<script async src=”https://platform.twitter.com/widgets.js&#8221; charset=”utf-8″></script>

मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला. मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. पंतप्रधानच शब्द पाळणार नसतील तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा, पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशला फसवले असा आरोप त्यांनी केला.

2014च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी नरेंद्र मोदी म्हणाले होते की काँग्रेसने आईची हत्या केली व मुलाला वाचवलं. जर मी असतो तर मी आईलाही वाचवलं असतं. आंध्रप्रदेशच्या लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला असं गल्ला म्हणाले. परंतु मोदींनी आंध्रप्रदेशला वाचवलं नसल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं की जर आंध्रला विशेष राज्याचा दर्जा दिला तर अन्य राज्ये पण अशी मागणी करतील, हा अत्यंत निराधार युक्तिवाद असल्याचे सांगताना मंत्रिमंडळानं आंध्रप्रदेशसाठी विशेष दर्जा देण्याचं मान्य केलेलं आहे हे अर्थमंत्र्यांना माहित नाही का असा सवाल गल्ला यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No confidence motion in lok sabha tdp criticise modi government
First published on: 20-07-2018 at 12:14 IST