News Flash

No Confidence Motion in Lok sabha : आम्ही केंद्र सरकारसोबत-नितीशकुमार

नितीशकुमार यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले होते, अशात त्यांनी केंद्र सरकारसोबतच असल्याचे म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

लोकसभेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. सरकारने जनतेची कामे केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशात काँग्रेस आणि इतर अनेक पक्षांनी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सरकारची अग्नीपरीक्षा आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आम्ही सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे.

विरोधी गटातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, सप या प्रमुख पक्षांची एकी कायम राहील. ‘आप’नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात नितीश कुमार काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. मात्र काही वेळापूर्वीच एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना नितीशकुमार यांनी आमचा पाठिंबा केंद्र सरकारलाच असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी नितीशकुमार भाजपासोबत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नितीशकुमारांची भेट घेतली. त्यानंतर नितीशकुमार यांचे मन वळवण्यात ते यशस्वी ठरले अशीही बातमी समोर आली होती. आता अविश्वास ठरवाच्या दिवशी नितीशकुमार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे होते आणि त्यांनी आपण मोदी सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 12:16 pm

Web Title: no confidence motion in lok sabha we are backing to modi government says nitish kumar
Next Stories
1 No Confidence Motion in Lok sabha: ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापेक्षा कमी पैसे आंध्रच्या राजधानीसाठी’
2 No Confidence Motion in Lok sabha: सध्या वन डेचा जमाना, टेस्टचा नाही; भाजपाचे काँग्रेसला उत्तर
3 No Confidence Motion in Lok sabha: बिजू जनता दल खासदारांचा सभात्याग
Just Now!
X