News Flash

करोना विषाणू म्हणजे देवानं आपल्या पापांची दिलेली शिक्षा : शफीकुर्रहमान बर्क

ईदनिमित्त बाजार आणि मशिदी खुल्या करण्याचीही केली मागणी

सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. देशाभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान. “करोना विषाणू म्हणजे देवानं आपल्या पापांची दिलेली शिक्षा आहे,” असं वक्तव्य संभळचे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केलं. तसंच यावेळी त्यांनी बकरी ईदनिमित्त जनावरांच्या खरेदीविक्रीसाठी बाजार सुरू करण्याचीही मागणी केली. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“करोना विषाणूवर आजपर्यंत कोणताही उपचार आढळलेला नाही. याचाच अर्थ करोना विषाणू हा एक आजार नाही. ती आपल्या पापांसाठी देवानं दिलेली एक शिक्षा आहे. करोनाचा उत्तम इलाज म्हणजे आपण सर्वांनी देवाची प्रार्थना केली पाहिजे,” असं शफीकुर्रहमान बर्क म्हणाले.

“लवकरच बकरी ईद येत आहे. जनावरांच्या खरेदीविक्रीसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पहिल्यांदा बाजार लागत होते. त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जाऊन ते खरेदी करू शकत होती. बकरी ईद पूर्वी बाजार लागावा अशी आमची मागणी आहे. अल्लाहचे धन्यवाद करण्यासाठी नमाज पठण केलं जातं. त्यामुळे मुस्लिमांना नमाज पठणासाठी मशिदी आणि इदगाह खुले करण्यात यावे,” अशी आमची मागणी असल्याचंही शफीकुर्रहमान बर्क म्हणाले. “आम्ही अल्लाहच्या दरबारात माफी मागण्यासाठी जाऊ आणि त्या ठिकाणी अल्लाह आमचं ऐकेल आणि आपल्यावर आलेलं संकटही दूर होईल,” असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 7:25 pm

Web Title: no cure of coronavirus has been found so far it is not a disease but punishment by god for our sins shafiqur rahman barq jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उद्यापासून कर्नाटकात लॉकडाउन नाही, लोकांनी कामावर जायला हवं ! मुख्यमंत्री येडियुरप्पांची घोषणा
2 महाराष्ट्र, तामिळनाडूमधून आलेल्या लोकांमुळे कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ – येडियुरप्पा
3 पुन्हा सत्तेत आल्यास गरीबांना आयुष्यभर मोफत धान्य देणार : ममता बॅनर्जी
Just Now!
X