05 April 2020

News Flash

काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यास विरोध केलेल्या ब्रिटिश खासदारास प्रवेशबंदी

मजूर पक्षाच्या खासदार अब्राहम यांचा हा दावा भारताच्या गृह विभागाने खोडून काढला.

नवी दिल्ली/ लंडन : आपल्याजवळ वैध व्हिसा असूनही, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आपल्याला प्रवेश नाकारण्यात येऊन दुबईला पाठवण्यात आले; असे ब्रिटिश महिला खासदार डेबी अब्राहम यांनी सोमवारी सांगितले. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या भारताच्या निर्णयास विरोध  करून त्यांनी टीका केली होती.

मजूर पक्षाच्या खासदार अब्राहम यांचा हा दावा भारताच्या गृह विभागाने खोडून काढला. तुमचा ई-व्हिसा रद्द करण्यात येत असल्याचे या खासदारांना आधीच कळवण्यात आले होते, पण तरीही त्या दिल्लीला येऊन पोहचल्या, असे गृह विभागाच्या प्रवक्त्याने नवी दिल्लीत सांगितले. डेबी अब्राहम या ब्रिटनच्या काश्मीरविषयक सर्वपक्षीय संसदीय गटाच्या अध्यक्ष आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 1:32 am

Web Title: no entery access british mp special status of kashmir akp 94
Next Stories
1 ‘सारथी’च्या दोनशे लाभार्थ्यांचे दिल्लीत आंदोलन
2 दिल्लीतील उद्याच्या शिवजयंती राष्ट्रोत्सव सोहळ्यात १० देशांचे राजदूत
3 हुबेईत वाहतुकीवर निर्बंध, सार्वजनिक ठिकाणे बंद
Just Now!
X