News Flash

मेहुल चोक्सीच्या अपहरणाचे पुरावे नाहीत पण लोकांमध्ये चर्चा; अँटिग्वाच्या पंतप्रधानाची माहिती

मालमत्तेचे आमिष देऊन मेहुल चोक्सीचे अपहरण झाले होते असा दावा त्याच्या वकिलांनी केला होता

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा करुन चोक्सी फरार झाला होता

भारतातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या अपहरण प्रकरणात अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान म्हणाले आहेत की त्यांना चोक्सीच्या अपहरणाचा कोणताही पुरावा मिळाला नसला तरी त्याची चर्चा लोकांमध्ये आहे असे पंतप्रधान ब्राऊन यांनी संसदेत विरोधी खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेमध्ये १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्यानंतर भारतातून पळून गेले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बार्बुडाचे नागरिकत्व घेतलं होतं.

संसदेतील विरोधी पक्षातील खासदारांनी पंतप्रधान ब्राऊन यांना स्कॉटलंड यार्ड किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेला मेहुल चोक्सीच्या अपहरणाशी संबंधित पुरावे सापडले आहेत का असा प्रश्न विचारला होता. यावर “मला पुराव्यांची माहिती नाही परंतु मेहुल चोक्सी याचे अपहरण झाले असल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रातून मिळाली आहे. मला माहित आहे कायदेशीर संस्थानी याचा तपास केला असेल आणि त्यांच्याकडे काही संशयास्पद माहितीदेखील असेल. मात्र मला ठोस पुराव्यांविषयी माहिती नाही,” असे पंतप्रधान ब्राऊन यांनी सांगितले.

ती मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नाही, तर…; चोक्सीच्या वकिलांनी केला धक्कादायक दावा

“ज्या बोटीमध्ये मेहुल चोक्सीचे काथित अपहरण झाले, ती अँटिग्वामध्ये कायदेशीररीत्या आणली होती. त्या बोटीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत मला माहिती नाही. आपल्याला तर हे माहित आहे की, कॅरिबियन क्षेत्राच्या सीमा कमकुवत आहेत आणि त्याच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे पुरेसे लोक नाहीत,” असे ब्राऊन म्हणाले.

मी कायदा पाळणारा माणूस, उपचारासाठी भारत सोडला; चोक्सीचा कोर्टात दावा

चोक्सीचे वकिलांनी असा दावा केला होता की, मेहुल चोक्सी स्वतः अँटिगाहून डोमिनिकाला गेला नव्हता तर त्याचे अँटिगा येथून अपहरण करुन डोमिनिका येथे नेण्यात आलं. कायद्याच्या नियमांचे आणि मूलभूत हक्कांचे भयंकर उल्लंघन केल्याचे म्हणत चोक्सीचे वकिल मायकल पोलॉक यांनी हा भयानक प्रकार आहे असे म्हटले होते. मालमत्तेचे आमिष देऊन त्याचे अपहरण झाले. त्याच्या डोक्यावर एक बॅग ठेवली होती. त्याला मारहाण करत जबरदस्तीने बोटीवर बसवले आणि बेकायदेशीरपणे दुसर्‍या देशात नेण्यात आले असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 12:01 pm

Web Title: no evidence of mehul choksi abduction but discussion among the people information of the pm of antigua abn 97
Next Stories
1 भाजपा आयटी सेलच्या दृष्टीने ‘हा’ देशद्रोह नाही का?; काँग्रेस खासदाराचा प्रश्न
2 प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, १५ दिवसांतील तिसरी भेट; राजकीय चर्चांना उधाण
3 Covid-19: तेलंगणचे मुख्यमंत्री संतापले, “या टीव्हीवाल्यांना शाप लागेल, हे करोनाबद्दल…..”
Just Now!
X