24 November 2020

News Flash

आजचा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढीतून सुटका

पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतींमधून ग्राहकांना आजचा दिवस दिलासा मिळाला आहे. बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झालेली नाही.

पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतींमधून ग्राहकांना आजचा दिवस दिलासा मिळाला आहे. बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झालेली नाही.  मुंबईत मंगळवारी प्रतिलिटर पेट्रोल ९१ रुपये २० पैसे तर प्रतिलिटर डिझेल ७९ रुपये ८९ पैसे होते. तेच दर आज कायम आहेत. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे मागच्या दीड महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत आहे.

दिल्लीतही प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८३ रुपये ८५ पैसे तर प्रतिलिटर डिझेलचा दर ७५ रुपये २५ पैसे कायम आहे. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे.

पेट्रोलियम उत्पादनांचा अजून जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हॅट आणि अन्य स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोलचे दर बदलत जातात. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात रोजच्या रोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किंमती वाढत असताना सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कर कमी केलेला नाही. ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने ही दरवाढ सुरु आहे. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2018 7:37 am

Web Title: no hike in petrol diesel rate 2
टॅग Diesel,Petrol
Next Stories
1 भाजपा सरकारने सीपीआय-एमचे ४० वर्षे जुने मुखपत्र बंद करण्याचे दिले आदेश
2 सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत दिल्लीतील आंदोलन अखेर मागे
3 बरहम सालेह इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष
Just Now!
X