24 September 2020

News Flash

पाकिस्तानकडून अद्याप कोणताही तपशील नाही!

परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट

संग्रहित छायाचित्र

कुलभूषण जाधव प्रकरण

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानकडून कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानुसार कुलभूषण जाधव यांना कोणत्याही अडथळ्याविना आणि बिनशर्त राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेऊ द्यावी, अशी मागणीही भारताने केली आहे.

कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानकडून आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत पाकिस्तानने भारताला माहिती दिली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, पाकिस्तानने भारताला संबंधित दस्तऐवज उपलब्ध करून द्यावा, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:02 am

Web Title: no information has been received from pakistan about kulbhushan jadhav case abn 97
Next Stories
1 विजय मल्याच्या याचिकेवर २० ऑगस्टला सुनावणी
2 पोलिसांविरुद्धच्या चौकशीचा सद्य:स्थिती अहवाल सादर करा!
3 भारतात करोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला २० लाखांचा टप्पा
Just Now!
X