News Flash

त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स आणि गॉगल वापरण्यास बंदी

या आदेशानंतर सीपीएम आणि काँग्रेस या विरोधीपक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारची ही सरंजामी मानसिकता असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

त्रिपुरातील भाजपा-आयपीएफटीच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड संदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत जीन्स, डेनिमचे कपडे आणि सन ग्लासेस वापरता येणार नाहीत. एका परिपत्रकाद्वारे सरकारकडून हे जाहीर करण्यात आले आहे. या आदेशानंतर सीपीएम आणि काँग्रेस या विरोधीपक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारची ही सरंजामी मानसिकता असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

त्रिपुराचे मुख्य सचिव सुशिल कुमार यांनी हे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार, जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, मंत्री तसेच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्य पातळीवरील बैठकीत तसेच उच्च स्तरीय बैठकीत हे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

२० ऑगस्ट रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये ड्रेस कोडबद्दल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जीन्स आणि कार्गो पॅन्ट वापरु नये असे म्हटले आहे. त्याचबरोबर बैठकांच्या वेळी अनेक अधिकारी मोबाईलवर आलेले मेसेज वाचत असतात किंवा टाईप करत असतात हे देखील चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्या माणिक सरकारच्या काळात अधिकाऱ्यांना आपले हात खिशातून बाहेर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, याची आठवण यात करुन देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 4:40 pm

Web Title: no jeans or sunglasses tripura tells bureaucrats to stick to dress code as code of conduct
Next Stories
1 भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सनं खास डिझाईन केलेली ‘सफारी स्टॉर्म’
2 आरएसएसच्या कार्यक्रमाचे राहुल गांधींना आमंत्रण ?
3 पर्वतरांगांवर रात्रीच्या वास्तव्यास बंदी, हायकोर्टाचा निर्णय
Just Now!
X