24 November 2020

News Flash

पाकिस्तानला चर्चेसाठी कोणताही संदेश पाठविला नाही -परराष्ट्र मंत्रालय

इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी वरील दावा एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केला होता

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानशी चर्चा करण्याची भारताची इच्छा आहे असा संदेश भारताने पाठविल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने केला. त्याचे भारताने गुरुवारी जोरदार खंडन केले.

अशा प्रकारचा कोणताही संदेश भारताने पाठविलेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी वरील दावा एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केला होता त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीवास्तव यांनी त्याचे खंडन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:31 am

Web Title: no message sent to pakistan for discussion ministry of external affairs abn 97
Next Stories
1 देशात ६७,७०८ नवे बाधित
2 जम्मू, काश्मीर, लडाख हे भारताचे अंतर्गत भाग!
3 किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा
Just Now!
X