ज्या पत्रकारांना प्रेस इन्फर्मेशन ब्युरो या संस्थेने अधिस्वीकृती दिली आहे त्यांनी प्रत्येक वर्षी अधिस्वीकृतीचे नूतनीकरण करताना पोलिस तपासणीस सामोरे जाण्याची गरज नाही.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीआयबी व गृह मंत्रालय यांच्यातील या चर्चेत अधिस्वीकृतीच्या नूतनीकरणासाठी पुन्हा नव्याने तपासणीची गरज नाही असे ठरवण्यात आले आहे. असे असले तरी नूतनीकरणाची सर्व प्रकरणे गृह मंत्रालयाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडे नेहमीच्या पद्धतीप्रमाणेच पाठवली जाणार आहे.
पीआयबीचे महासंचालक फ्रँक नोरोन्हा यांनी सांगितले, की पत्रकारांना आता प्रत्येक वर्षी पीआयबी कार्डचे नूतनीकरण करण्यासाठी पोलिस तपासणीस सामोरे जावे लागणार नाही,
गृह मंत्रालयाने अगोदर पीआयबीला असे सांगितले होते, की पीआयबी कार्ड देताना प्रत्येक वर्षी पत्रकारांची पोलिस तपासणी करण्यात यावी. पीआयबी कार्ड असलेल्या पत्रकारांना वेगवेगळ्या मंत्रालयात व विभागात प्रवेश दिला जातो. खूप वेळ जातो व त्यात अनेक व्यावहारिक अडचणी येतात असे नंतर पीआयबीने गृह मंत्रालयाला कळवले होते.