20 October 2019

News Flash

‘काश्मीरमध्ये ‘जैश ए महम्मद’ नेस्तनाबूत’

पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराने धडक कारवाईत जैश ए महम्मद संघटनेला पुरते नेस्तनाबूत केले आहे

लेफ्टनंट कर्नल के जे एस ढिल्लाँ

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराने धडक कारवाईत जैश ए महम्मद संघटनेला पुरते नेस्तनाबूत केले आहे, असे लेफ्टनंट कर्नल के जे एस ढिल्लाँ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुलवामा हल्ल्यानंतर जैशचे सहा कमांडर मारले गेल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, लष्कराने जैशचे कंबरडे इतके मोडले आहे, की आता त्या संघटनेचे नेतृत्व करण्यास कुणी पुढे येईनासे झाले आहे, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या असल्या तरी त्याला आम्ही चोख उत्तर देत आहोत. जम्मू आणि काश्मीरमध्ये जैश ए महम्मद विरोधातील कारवाईत या वर्षी आतापर्यंत ६९ दहशतवादी मारले गेले आहेत. या कारवायांत १२ जणांना अटकही झाली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर ४१ दहशतवादी मारले गेले असून त्यात १३ पाकिस्तानी होते, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्यात सामील असलेल्या सर्व दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराला यश आले आहे. हल्ल्यानंतर २१ दिवसांत लष्कराने जैशच्या १४  जणांसह १८ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जैशचा कमांडर मुदासिर हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता, तो या कारवाईत मारला गेला, असेही ढिल्लाँ म्हणाले.

First Published on April 25, 2019 2:29 am

Web Title: no one willing to take leadership of jaish e mohammed in kashmir kjs dhillon