24 November 2020

News Flash

“खेळाडूंना नरेंद्र मोदींसारखी वागणूक आधीच्या एकाही पंतप्रधानानं दिली नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा केली होती.

संग्रहित छायाचित्र

ज्यावेळी पंतप्रधान खेळाबद्दल बोलतात, खेळाडुंना प्रोत्साहन देतात तेव्हा बरं वाटतं अशी भावना कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या बबिता फोगटने व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा केली होती. तसेच सगळ्या विजेत्या खेळाडूंचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले होते.

बॅडमिंटनपटू सायना नेहवालनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. सध्या खेळाडूंसाठी सर्वोत्कृष्ट काळ असल्याचे सांगताना, सगळ्या खेळांमध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सायनानं म्हटलं आहे.

त्याचा संदर्भ देत बबिता फोगटने मोदी यांची शाबासकी महत्त्वाची असल्याचे सांगताना, याआधी कुठल्याही पंतप्रधानाने अशी वागणूक खेळाडूंना दिली नव्हती असेही म्हटले आहे. खेळामध्ये मोदींएवढा रस याआधीच्या कुठल्याही पंतप्रधानानं घेतला असेल असं मला वाटत नाही असं बबिता म्हणाल्याचे वृत्त एएनआयनं दिलं आहे. वरवर मोदींचे आभार मानणारं हे वक्तव्य असलं तरी अन्य पंतप्रधानांशी तिनं तुलना केल्यामुळे आणि मोदी या बाबतीत सगळ्यात चांगले पंतप्रधान असल्याचे म्हटल्यामुळे तिचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतं.

मोदी समर्थक तिच्या वक्तव्याचा वापर आधीच्या पंतप्रधानांना लक्ष्य करण्यासाठी करू शकतात, तर काँग्रेस समर्थक असलेले मोदी विरोधकही तिच्या वक्तव्यामुळे बिथरू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:21 pm

Web Title: no other pm treated sports so well as narendra modi did
Next Stories
1 VIDEO …जेव्हा साधूचा वेश धारण करुन ब्रेट ली मुंबईतील मुलांबरोबर क्रिकेट खेळतो!
2 पत्रकार म्हणाला, गौतम गंभीर ‘दहशतवादी’; चाहत्यांनी ट्विटर सोडण्याचा दिला सल्ला
3 ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे लक्ष्य!
Just Now!
X