News Flash

५००, १००० च्या जुन्या नोटा उद्यापासून बदलता येणार नाहीत; केंद्राचा निर्णय

जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहेत.

नागपूरात १ कोटी रुपये जप्त

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुन्या नोटा उद्यापासून बँकांमध्ये बदलता येणार नाहीत, मात्र, त्या नोटा बँकांमध्ये जमा करता येतील, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तर १५ डिसेंबरपर्यंत रुग्णालये आणि पेट्रोल पंपावर जुन्या ५०० च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

संसदेच्या दोन्ही सभागृहात नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्याने कामकाज सातव्या दिवशीही तहकूब करावे लागले. विरोधकांचा विरोध कमी व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
गुरुवारी रात्रीच केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वीच जुन्या नोटांबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा उद्यापासून बँकांमधून बदलून मिळणार नाहीत. मात्र, जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने यावेळी घेतला. तसेच १५ डिसेंबरपर्यंत रुग्णालये आणि पेट्रोल पंपावर जुन्या ५०० च्या नोटा स्वीकारल्या जातील. केंद्रीय, राज्य व नगरपालिका शाळांमध्ये २००० रूपयांपर्यंतचे शुल्क भरण्यासाठी ५०० रुपयांच्या नोटा वापरता येणार आहेत. प्री-पेड मोबाईलचे ५०० रूपयांचे टॉप-अप करण्यासाठी जुन्या ५०० रूपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असेही निर्णय यावेळी घेण्यात आले. सहकारी ग्राहक भांडारातूनही एकाचवेळी ५००० रूपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे.  राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र, ३ ते १५ डिसेंबरपर्यंत टोलनाक्यांवर ५०० च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 7:54 pm

Web Title: no over the counter exchange of old rs 500 and rs 1000 notes after midnight
Next Stories
1 नोटाबंदीमुळे टळला तरुणीचा सौदा
2 …तर उचित ठरणार नाही; पाकचा भारताला इशारा
3 संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली कॅबिनेट बैठक
Just Now!
X