19 September 2020

News Flash

‘सौदी’च्या कामगार धोरणामुळे अस्वस्थता नको’

सौदी अरेबियाच्या नव्या कामगार धोरणांमुळे तेथे काम करणाऱ्या भारतीयांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती अनेकांना वाटू लागली होती, मात्र भारतीयांनी अस्वस्थ होऊ नये असे केरळचे मुख्यमंत्री

| March 31, 2013 03:57 am

सौदी अरेबियाच्या नव्या कामगार धोरणांमुळे तेथे काम करणाऱ्या भारतीयांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती अनेकांना वाटू लागली होती, मात्र भारतीयांनी अस्वस्थ होऊ नये असे केरळचे मुख्यमंत्री ऊमेन चंदी यांनी म्हटले आहे.
भारताचे सौदी अरेबियाशी सौहार्दपूर्ण संबंध असून तेथील नव्या कामगारविषयक कायद्याचा – ‘निताकत’चा त्रास भारतीयांना होणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. स्थानिकांना रोजगार मिळावा आणि रोजगाराच्या संधी अन्य देशीयांकडून हिरावल्या जाऊ नयेत म्हणून सौदी अरेबियाच्या कामगार कायद्यात बदल घडवून त्याजागी ‘निताकत’ आणण्यात आला आहे. त्या देशात केरळ राज्यातील लाखो लोक रोजगारानिमित्त राहात असल्याने त्यांना याचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली.मात्र यामुळे अस्वस्थ होऊ नये, राज्य सरकार याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले केरळमधील खासदार अँटोनी, वायलर रवी तसेच ई. अहमद यांच्याशी चर्चा करीत आहे, असे मुख्यमंत्री चंदी यांनी म्हटले आहे.
एकाच वेळी सौदीमधील भारतीयांच्या नोकऱ्या टिकाव्यात तसेच दुर्दैवाने त्यांच्या नोकऱ्या गेल्याच तर त्यांना पर्यायी नोकरी देण्याची सुविधा निर्माण करता येईल का, अशा दोन्ही बाबींवर केरळ सरकार काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 3:57 am

Web Title: no panic situation due to new saudi job law chandy
Next Stories
1 दहशतवाद्यांना ‘बोट’ विकणाऱ्यांवर समन्स बजावले
2 भाजपची संसदीय समिती जाहीर: समितीत नरेंद्र मोदींचा समावेश
3 मुष्टियोद्धा विजेंदरसिंगच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे
Just Now!
X