13 August 2020

News Flash

हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल नाही!

जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर केवळ हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारानांच गाडीत पेट्रोल भरून मिळत आहे.

No Petrol for two wheeler Drivers Without Helmet in Adilabad

वाहतुकीच्या नियमांचे योग्य रितीने पालन होण्यासाठी तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. २ जुनपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, यासाठी विशेष मोहिमदेखील प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर केवळ हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारानांच गाडीत पेट्रोल भरून मिळत आहे. पेट्रोल पंपचालकांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 11:53 am

Web Title: no petrol for two wheeler drivers without helmet in adilabad
टॅग Telangana,Transport
Next Stories
1 मार्क झुकेरबर्गचेच ट्विटर, पिंट्रेस्ट अकाऊंट हॅक
2 कतार भेटीत दहशतवाद, गुंतवणुकीवर भर
3 अमेरिकी काँग्रेसमध्ये मोदींच्या भाषणाबाबत भारतीयांमध्ये उत्सुकता
Just Now!
X