कार्यालयात प्रवेश करण्याआधी आपल्याजवळील सेलफोन, पेन बाहेरील टेबलावर जमा करावेत असे सुचना फलक केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर एका रात्रीत नवे टेबल बसविण्यात आले. कार्यालयात प्रवेश करण्याआधी या टेबलावर आपल्याजवळील मोबाईल फोन्स, पेन यावस्तू जमा कराव्यात असे सूचनापत्र कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहेत. आपल्यावर स्टिंगओपरेशन केले जाऊ नये यासाठीची खबरदारी मंत्र्यांकडून घेतली जात असल्याचे यामधून दिसून येते.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर मोबाईल फोन्स आणि पेन आत घेऊन येण्यास बंदी असल्याचे सुचनापत्र लावण्यात आले आहे. सध्या बाजारात ‘स्पायकॅम’ असणारे पेन सहज उपलब्ध होतात यापार्श्वभूमीवर ‘स्टिंगऑपरेशन’ केले जाऊ नये यासाठी मंत्री काळजी घेत असल्याचे बोलले जात आहे.
विरोधक बदनामी करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे अशाप्रकारची काळजी घेतली जात असल्याचे मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यालयाबाहेरही अशाप्रकारचे सुचना फलक लावण्यात आले आहे. तसेच कार्यालयाबाहेर मोबाईल फोन्स, पेन जमा करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या टेबलाचे प्रसारमाध्यमाचा एक छायाचित्रकार छायाचित्र टीपत असताना स्मृती इराणी त्याच्यावर भडकल्या आणि आपण छायाचित्र का घेतले असे विचारत त्या छायाचित्रकाराची कानउघाडणीही केली.