15 August 2020

News Flash

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून स्मृती इराणी, हेपतुल्लांना वगळले

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नजमा हेपतुल्ला यांच्याबरोबर खासदार हेमा मालिनी यांना वगळण्यात आले आहे, तर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व वीरेंद्र सिंह

| March 13, 2015 12:59 pm

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नजमा हेपतुल्ला यांच्याबरोबर खासदार हेमा मालिनी यांना वगळण्यात आले आहे, तर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व वीरेंद्र सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह बहुतेक ज्येष्ठ नेत्यांना कायम ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत व्ही. के. सिंह, सुब्रमण्यम स्वामी यांचाही समावेश करण्यात आला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात बंगळुरूमध्ये नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे. गीतकार व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो व खासदार किरण खेर यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे. १११ सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुसंख्य केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह २७ जणांचा कायम निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे, तर ४० विशेष निमंत्रित आहेत.भाजपचे सर्व आठ मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री याखेरीज २४ माजी मुख्यमंत्री व तीन माजी उपमुख्यमंत्र्यांना कायम निमंत्रित म्हणून स्थान मिळाले आहे. जसवंत सिंह व त्यांचे पुत्र मानवेंद्र यांना, तसेच राज्यपालपदी नियुक्त केलेल्या नेत्यांना अपेक्षेप्रमाणे वगळण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 12:59 pm

Web Title: no place for smriti irani hema malini najma in bjp national executive
टॅग Smriti Irani
Next Stories
1 मुंबई, कोलकाता किनाऱ्यांवर सर्वाधिक प्रदूषण
2 बिनतारी वीजवहनाचा क्रांतिकारी प्रयोग
3 केरळ विधानसभेत विरोधकांचा धुमाकूळ, अर्थसंकल्पाचे वाचन रोखले
Just Now!
X