एकीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करत आहेत. पण, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना सरकार सरकार तयार करत नाही, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी संसदेत सांगितले. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढाविण्यासाठी सरकार काही योजनावर काम करत करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू असून, अधिवेशनात खासदार आर. पार्थिपन आणि खासदार जे.एस. जॉर्ज यांनी अतारांकित प्रश्न विचारले होते. सरकार अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची योजना बनवत आहे का? सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या अशा योजनाची स्थिती काय आहे? अन्न प्रक्रिया उद्योगाअभावी शेतकऱ्यांचं भाजीपाला आणि फळे मोठ्या प्रमाणात खराब होतात, याची माहिती सरकारला आहे का? असे प्रश्न त्यांनी विचारले होते. यावर उत्तर देताना साध्वी निरंजन ज्योती यांनी अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना सरकार तयार करत नाही.

अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी पीएमकेएसवाय ही योजना आणणार आहे. तसेच शेतकऱ्यांचं शेतमालाला चांगला भाव मिळून उत्पन्न वाढाव यासाठीही सरकार काही योजनावर काम करत आहे.  २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकाने मंत्रालयीन समिती स्थापन केली असल्याचे सरकारने २० जुलै रोजी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.