ईशान्य भारतात भाजपाच्या बाजूने जनतेचा कौल आल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तिसऱ्या आघाडीचे समर्थन केले होते. यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री समन सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘कसली तिसरी आघाडी? आता कितीही आघाड्या होऊ द्या जगातली कुठलीच शक्ती आता भाजपाला रोखू शकत नाही’.


महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणे आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील भाजपापाला झटके द्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या अडचणी वाढवण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीला समर्थन दिले आहे. टीडीपीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, जर भाजपाने नायडू यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते लवकरच भाजपशी असलेल्या युतीतून बाहेर पडतील.