News Flash

CORONA: कारण नसताना CT स्कॅन नको, नाही तर…

एका CT स्कॅनमध्ये ३०० एक्सरेच्या बरोबरीचे रेडिएशन

देशात करोनामुळे भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे करोनापासून बचावासाठी प्रत्येक जण मास्क आणि सॅनेटाईझर्सचा वापर करत आहेत. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळत आहे. असं असलं तरी काही जणांना करोनाची कोणतीच लक्षणं दिसत नाही. मात्र त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. अशात अनेक जण सीटी स्कॅनचा पर्याय निवडतात. मात्र त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळू शकतं असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

‘करोनाच्या सुरुवातीला सीटी स्कॅन करुन काहीच फायदा नाही. कित्येक वेळा पॅचेस दिसतात. मात्र उपचाराअंती ते नाहीसे होते. एका सीटी स्कॅनमध्ये ३०० एक्सरेच्या बरोबरीचे रेडिएशन असतात. त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. चेस्ट एक्सरे नंतर डॉक्टरांच्या सल्ला घेऊनच सीटी स्कॅन करण्याचा ठरवावं’, असा सल्ला डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

‘काही जण दर तीन महिन्यानंतर सीटी स्कॅन करत आहे, हे पुर्णत: चुकीचं आहे. स्वत:हून डॉक्टर बनू नका. साधी लक्षणं असणारे औषधाने बरे होतात. त्यासाठी स्टेरॉईड घेण्याची गरज नाही. स्वत:हून डॉक्टर बनू नका’, असा त्यांनी पुढे सांगितलं.

Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन

सोमवारी देशात ३,६८,०० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३,४१७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 7:15 pm

Web Title: no reason ct scan may risk of cancer say aiims director rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 महिंद्रा आणणार ‘करोना’वर औषध; पेटंट मिळण्याची प्रतीक्षा
2 या महिन्यातल्या सगळ्या ऑफलाईन परीक्षा पुढे ढकला- शिक्षण मंत्रालयाचा आदेश
3 Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन
Just Now!
X