News Flash

Coronavirus : रजेवर असलेल्या कुणाचाही पगार कापू नका-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं आहे

फाइल फोटो

करोना व्हायरस हे जागतिक संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सगळेच देश आपल्या परिने प्रयत्न करत आहेत. मात्र भारतीय नागरिकांचं विशेष कौतुक करावं लागेल कारण त्यांनी या करोनाचा मुकाबला अत्यंत प्रभावीपणे केला आहे. अजूनही करत आहेत. असं असलं तरीही या संकटातून आपण पूर्णपणे बाहेर पडलो अशी स्थिती नाही. अशात ज्या व्यक्ती कामावर न येता रजेवर आहेत. ज्यांना घरी रहावं लागलं आहे त्यांचं वेतन कापण्यात येऊ नये. सगळ्या सरकारी आणि खासगी संस्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं आहे.

आपल्या देशावरच नाही तर जगावरही या महारोगामुळे आर्थिक संकट कोसळलं आहे. अशात जो नोकरदार माणूस घरी राहून आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतो आहे त्याचा पगार कोणत्याही परिस्थितीत कापला जाऊ नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 9:52 pm

Web Title: no salary cut of any employee who is at home due to coronavirus in india says pm narendra modi scj 81
Next Stories
1 Corona virus: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा प्रमुख मुद्दे
2 साठेबाजी संदर्भात मोदींनी केलं महत्वाचं आवाहन
3 “२२ मार्चला संध्याकाळी ५ वाजता थाळी, टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचं कौतुक करा”