29 November 2020

News Flash

पंतप्रधान मोदी पुन्हा चुकले… सिक्कीम विमानतळाबद्दलचा ‘हा’ दावा खोटा

मोदींनी दिलेली विमानतळासंदर्भातील माहिती पूर्णपणे चुकीची

मोदींचा दावा खोटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी सिक्कीममध्ये पाकयाँग विमानतळाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी पाकयाँग विमानतळ हे सिक्कीममधील पहिले तर देशातील १०० वे विमानतळ असल्याचे म्हटले होते. यावेळीस बोलताना ते आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज देशाला १०० वं विमानतळ मिळालं आहे अशा शब्दांमध्ये आपल्या भाषणात या विमानतळाचा उल्लेख केला. पुढे बोलताना भाजप सरकारच्या काळामध्ये विमानतळाची कामे अधिक वेगाने होत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र आता उद्घाटन सोहळ्यात बोलताना मोदींनी दिलेली विमानतळासंदर्भातील माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे समोर येत आहे.

मोदींने ‘शंभराव्या’ विमानतळाबद्दल केलेले ट्विट

देशातील विमानतळांची संख्या १२५ हून अधिक असल्याचे नागरी विमान उड्डाण संचलनालयाची (डीजीसीए) आकडेवारी सांगते. भारतामधील नागरी उड्डाण क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या दोन प्रमुख संस्था आहे. नागरी विमान उड्डाण संचलनालय म्हणजेच डीजीसीए आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एएआय. या दोन्ही संस्था केंद्र सरकारच्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. ५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार एएआयच्या अंतर्गत १२९ विमातळे येतात. यामध्ये २३ आंतरराष्ट्रीय, ७८ देशांतर्गत, ८ कस्टम विमानतळांबरोबरच २० विमानतळं संरक्षण दलांकडे असणाऱ्या विमानतळांचा समावेश होतो. तसेच या अहवालानुसार १२९ विमानतळांपैकी १०१ विमानतळं वापरात आहेत.

ही आकडेवारी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींने कार्यान्वित विमानतळांचा आकडा सांगितला असल्याचे म्हटलं तरी त्यांनी सांगितलेला आकडा हा सरकारी आकडेवारीशी जुळत नाहीय. मोदींनी दिलेली माहिती आणि एएआय माहितीमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येते. खुद्द डीजीसीएच्या आकडेवारीवरूनच मोदी यांनी केलेला दावा केवळ खोटा असल्याचे दिसून येते.

यातील सर्वात अश्चर्याची बाबामध्ये खुद्द मोदी सरकारनेच विमानतळांची आकडेवारी १९ जुलै २०१८ आणि ८ ऑगस्ट २०१८ लोकसभेत दिली होती.

तर डीजीसीएने ३१ मार्च २०१८ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार देशातील कार्यान्वित विमानतळांचा आकडा ११० इतका आहे.

एकंदरितच ही सर्व आकडेवारी पाहता मोदींनी केलेला दावा हा खोटाच ठरत असल्याचे सिद्ध होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 4:45 pm

Web Title: no sikkims first airport is not the 100th airport of india as claimed by pm modi
Next Stories
1 विमानात श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ११ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
2 ‘अकुशल’ व्यक्तीला राफेलचे कंत्राट देणे हीच ‘स्कील इंडिया’ची ओळख: राहुल गांधी
3 आधार कार्डामुळे ९० हजार कोटी वाचले – अरुण जेटली
Just Now!
X