News Flash

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही स्तुती केली तरीही भाजपासोबत हात मिळवणार नाही’

आम्हाला भाजपाच्या पाठिंब्याचीही गरज नाही, आम्ही स्वबळावर सत्ता आणू हा विश्वास आहे.

कर्नाटक विधानसभेसाठीची निवडणूक भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना जवळ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची स्तुती केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही स्तुती केली तरीही भाजपा आणि बीडीएस यांच्यात एकमत  होऊ शकणार नाही असे देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. जनता दल सेक्युलर चे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनीच प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी कितीही स्तुती केली तरीही भाजपा आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची हातमिळवणी होणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझे नाव घेऊन माझी स्तुती केली होती. ही त्यांची राजकीय खेळी असू शकते किंवा त्यांना खरोखर तसे वाटत असेल मात्र त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ लगेच भाजपा आणि जनता दल सेक्युलर यांच्यात युती होईल असा काढणे योग्य नाही. आम्हाला खात्री आहे की या निवडणुकांच्या वेळी जनता आम्हाला साथ देईल आणि आम्ही स्वबळावर कर्नाटकात आमची सत्ता आणू असा दावा देवेगौडा यांनी केला. आम्हाला कोणाच्याही पाठिंब्याचीही गरज लागणार नाही. बसपा सोबत आमची युती फक्त २० जागांसाठी आहे मात्र या निवडणुकांमध्ये जनता आमच्या बाजूने निकाल देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एच. डी. देवेगौडांवर घराणेशाहीचा आरोप केला होता. याबाबतही देवेगौडा यांनी टीका केली. जो माणूस निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून आपल्या मुलाला राजकारणात आणतो त्याने माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणे कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा असे देवेगौडा यांनी म्हटले आहे. सिद्धरामय्या मला ज्ञान शिकवत आहेत. २००४ च्या निवडणुकांच्या वेळी ते भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्यास तयार झाले होते हे नाकारू शकतात का? असाही प्रश्न देवेगौडा यांनी विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 5:14 am

Web Title: no understanding with bjp says deve gowda day after pm modis praise
Next Stories
1 दहाव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या भामट्याला सातव्या पत्नीच्या तक्रारीनंतर अटक
2 दाऊदची माहिती मिळविण्यात पोलीस अपयशी
3 पत्रकारांकडे दिलेली कबुली सबळ पुरावा
Just Now!
X