स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी विरोधात अद्यापपर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नाही अशी माहिती इंदूर पोलिसांनी दिली आहे. हिंदू देवता आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर असभ्य भाषेतून टिप्पणी केल्याच्या आरोपावरुन इंदूर पोलिसांनी मुनावर फारुकी आणि अन्य चार जणांना अटक केली आहे. इंदूरमधील कार्यक्रमात जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपावरुन मुनावर फारुकीला दोन जानेवारीला अटक करण्यात आली.

कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजमध्ये काहीही द्वेषपूर्ण आढळलेले नाही असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडिया टुडेला सांगितले. “तक्रारदाराने दिलेले दोन व्हिडिओ फुटेज आम्ही तपासले. पण त्यात काहीही द्वेषपूर्ण आढळलेले नाही” असे एसएचओ कमलेश शर्मा यांनी सांगितले.

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
jitendra awhad Prakash Ambedkar (1)
“…तर पुढची पिढी माफ करणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना टोला; म्हणाले, “संविधानाविरोधात…”

इंदूर पोलिसांनी फारुकी आणि अन्य चौघांवर कलम २९५ ए, २९८, २६९ आणि ३४ कलमातंर्गत आरोप ठेवले आहेत. सर्व आरोपींना दोन जानेवारी इंदूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.