News Flash

करोना व्हायरसमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन....

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पण काँग्रेसने आमच्याशी चर्चा करण्यात आली नाही असे म्हटले आहे.

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.

आणखी वाचा- खासदार, आमदारांना सर्वात आधी करोना लस द्या; खट्टर सरकाराचे आरोग्य मंत्रालयाला पत्र

“सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली पण करोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वांचे एकमत झाले” असे प्रल्हाद जेशी यांनी अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. “करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, हिवाळयाचे महिने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत” असे जोशी यांनी अधीररंजन चौधरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. करोनामुळेच पावसाळी अधिवेशन सुद्धा उशिराने सप्टेंबर महिन्यात झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 11:51 am

Web Title: no winter session of parliament due to covid dmp 82
Next Stories
1 सामान्यांच्या खांद्यावरील खर्चाचा भार वाढला; गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला, जाणून घ्या नवे दर
2 मोदी सरकारसाठी आंदोलनकर्ते शेतकरी खलिस्तानी, तर भांडवलदार हे उत्तम मित्र – राहुल गांधी
3 भाजपाच्या माजी आमदाराला तीन वर्षांचा तुरुंगवास
Just Now!
X