News Flash

Nobel Prize 2020 : अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल जाहीर

त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

स्टॉकहोम (स्वीडन) : अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना २०२०चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना २०२० चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. लुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करुन देते असं नोबेल समितीनं त्यांचा गौरव करताना म्हटलं आहे.

कवयित्री लुईस ग्लक यांनी १९६८ मध्ये ‘फर्स्टबोर्न’ सोबत आपल्या कविता लेकनाला सुरुवात केली होती. त्यानंतर अल्पावधितच त्यांचा अमेरिकेतील समकालीन साहित्यविश्वात प्रमुख कवींमध्ये समावेश झाला. त्यांनी बारा कवितांचा संग्रह आणि काही निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहांपैकी ‘द वाइल्ड आयरिस’ हा काव्यसंग्रह सन १९९२ मध्ये प्रकाशित झाला होता. या काव्यसंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलं आहे.

२०१९ मध्ये पीटर हँडका यांना मिळाला होता साहित्यातला नोबेल

सन २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडका यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. उत्कृष्ट लेखन आणि भाषेतील नवीन प्रयोगांबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 6:30 pm

Web Title: nobel prize 2020 in literature awarded to american poet louise gluck aau 85
Next Stories
1 सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वाधिक दुरुपयोग; तबलिगी प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिपण्णी
2 कोलकात्याच्या रस्त्यावर हिंसक संघर्ष, पोलिसांचा भाजपा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
3 रॉ, आयबीकडून IRS अधिकाऱ्यांना इंटेलिजन्स ट्रेडक्राफ्टचे प्रशिक्षण
Just Now!
X