News Flash

Cornavirus : ६४ वर्षांत पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द

नोबेल फाऊंडेशनच्या संचालकांची माहिती

सध्या जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होत आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच माध्यमांच्या रिपोर्टनुसार ६४ वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. नोबेल पुरस्कारांचं आयोजन करणाऱ्या संस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. नोबेल पुरस्कार सोहळ वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

“ज्या प्रकारे नोबेल आठवडा आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही. सध्या करोनाच्या महामारीमुळे यावेळची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष निराळं आहे. सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. त्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल,” अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आयोजन

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नोबेल पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यालाच नोबेल विक म्हणूनही ओळखलं जातं. दरवर्षी या कालावधीत त्या वर्षातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना स्टॉकहोममध्ये आमंत्रित केलं जातं. स्टॉकहोमच्या सिटी हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात विजेत्यांसाठी स्वीडिश राजघराण्यातील आणि जवळपास १३०० पाहुण्यांसोबत भोजनाचंदेखील आयोजन केलं जातं. शांती पुरस्कार विजेत्यांना ओस्लोमध्ये सन्मानित केलं जातं. त्यांनादेखील याठिकाणी येण्याचं आमंत्रण दिलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 3:10 pm

Web Title: nobel prize ceremony cancelled this year coronavirus pandemic jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर दिली ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा, व्यंकय्या नायडूंनी दिली समज, म्हणाले…
2 राजस्थानातील नाट्य सर्वोच्च न्यायालयात; उच्च न्यायालयाच्या आदेशाला अध्यक्षांनी दिलं आव्हान
3 अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा
Just Now!
X