News Flash

#MeToo सेक्स स्कँडलमुळे नोबेल ‘अशांत’, यंदा साहित्याचा पुरस्कार नाही

साहित्याचे नोबेल पुरस्कार देणारी संस्थाच सेक्स स्कँडलच्या आरोपांमध्ये अडकल्यामुळे यंदाच्या वर्षी साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार नाही.

साहित्याचा नोबेल पुरस्कार देणारी संस्थाच सेक्स स्कँडलच्या आरोपांमध्ये अडकल्यामुळे यंदाच्या वर्षी साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार नाही. स्वीडीशी अॅकेडमीकडून साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जातो. पण फ्रेंच फोटोग्राफर जीन क्लाउड अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे स्वीडीश अॅकेडमी अडचणीत सापडली आहे. स्वीडिश अॅकेडमी यावर्षी पुरस्कार देणार नसून पुढच्यावर्षी २०१९ साली दोन्ही पुरस्कार विजेत्यांची नावाची घोषणा करु असे संस्थेने म्हटले आहे.

लोकांचा अॅकेडमीवरचा विश्वास कमी झाल्यामुळे संस्थेने यावर्षी पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. परंपरेनुसार पुरस्कार देण्यात यावा असे काही सदस्यांचे मत होते पण अन्य सदस्यांचा विरोध असल्यामुळे पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ७५ वर्षांत पहिल्यांदाच पुरस्कार विजेत्याचे नाव जाहीर होणार नाहीय.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेला अरनॉल्ट अॅकेडमीच्या सदस्या आणि कवियत्री कॅटरीना फ्रोस्टेनसन नवरा आहे. स्वीडिश अॅकेडमीकडून मिळणाऱ्या पैशावर अरनॉल्ट एक सांस्कृतीत प्रकल्पही चालवायचा.  जगभरात  #MeToo कॅम्पेनतंर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला जात आहे. याच कॅम्पेनतंर्गत हे प्रकरण समोर आले. अरनॉल्टवर १८ महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केले.

अरनॉल्टची पत्नी कॅटरीनाला समितीमधून हटवण्यासाठी मतदानही झाले. अॅकेडमीच्या स्थायी सदस्य सारा डेनिअस यांनी संस्थेने अरनॉल्टबरोबर सर्व संबंध तोडून टाकल्याचेही जाहीर केले. आतापर्यंत डेनिअससह अॅकेडमीच्या सहा सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी १९४३ साली दुसऱ्या विश्वयुद्धाच्यावेळी साहित्याचा नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आला होता. आता ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा हा पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध क्षेत्रांमधल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार दिला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2018 2:07 pm

Web Title: nobel prize for literature will announce next year
टॅग : Literature,Nobel Prize
Next Stories
1 महिलेचं शरीर हे पुरुषांसाठी खेळणं नाही: हायकोर्ट
2 मोफत स्मार्टफोन, लॅपटॉप आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्नाटकमध्ये भाजपाचा जाहिरनामा
3 जाहीर सभांमध्ये भाषण करण्यात वाजपेयींपेक्षा पंतप्रधान मोदी दोन पावलं पुढे – एचडी देवेगौडा
Just Now!
X