News Flash

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

नुकतेच बॅनर्जी यांनी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे म्हटले होते.

अभिजीत बॅनर्जी, नरेंद्र मोदी

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी आज (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेणार आहेत. नुकतेच बॅनर्जी यांनी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपाने त्यांना डाव्या विचारांचे असल्याचे सांगत विरोधीपक्षांच्या प्रभावाखील असल्याचा आरोप केला आहे. यापार्श्वभूमीवर बॅनर्जी हे पंतप्रधानांची भेट घेणार असल्याने सर्वांचे लक्ष या भेटीकडे आहे.

अभिजीत बॅनर्जी हे एक असे अर्थतज्ज्ञ आहेत ज्यांनी काँग्रेसला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘न्याय योजना’ हा वचननामा तयार करण्यासाठी मदत केली होती. या योजनेद्वारे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरीब जनतेला किमान वेतन सहाय्याची घोषणा केली होती.

दरम्यान, जेएनयूचे विद्यार्थी असलेल्या अभिजीत बॅनर्जी यांनी सध्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे म्हटले होते. यावरुन भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले होते की, “देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे बॅनर्जी यांचे विधान चुकीचे आहे. बॅनर्जी डाव्या विचारसरणीचे आहेत, त्यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेचेही कौतुक केले होते. मात्र, ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आणि जनतेनेही काँग्रेसला नाकारले. तसेच बॅनर्जी यांची विचारसरणीही जनतेकडून नाकारण्यात आली आहे.”

अभिजीत बॅनर्जी यांचे बालपण हे कोलकात्यात गेले असून पुढे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले आहे. त्यानंतर ते सध्या अमेरिकेत प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 11:07 am

Web Title: nobel winner abhijit banerjee to meet pm modi today aau 85
Next Stories
1 INX Media Case : जामीन मिळूनही चिदंबरम यांना राहावं लागणार कोठडीत!
2 एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होणार; पुढील महिन्यात निविदा मागवणार?
3 अपहरणकर्ते ट्रॅफिकमध्ये अडकले; सातव्या मिनिटाला पोलिसांच्या लागले हाती
Just Now!
X