नोबेल पारितोषिक विजेते आणि शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक गॅरी एस. बेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त शिकागो विद्यापीठाने रविवारी प्रसिध्द केले आहे. ते ८३ वर्षांचे होते.
अर्थशास्त्रातील सिध्दांत मानवी वर्तनाच्या विस्तृत गोष्टींना रीतसर लागू करण्याबाबतच्या संशोधनासाठी बेकर यांना १९९२ साली अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.
मुक्त बाजार या विषयातील ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रेडमॅन यांचे शिष्य असलेले बेकर यांचे दिर्घ आजारानंतर शनिवारी निधान झाल्याचे वृत्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
आर्थिक विश्लेषण करण्यासाठी बेकर यांनी गुन्हेगारी, भेदभाव, व्यसन, लोकसंख्या आणि कुटुंब या विषयांचा भरपूर अभ्यास केला होता, असं देखिल विद्यापीठाने म्हटले आहे.

भारतीय कनेक्शन
रिझर्व्ह बॅंकेचे भारताचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन आणि बेकर हे शिकागो विद्यापीठात काही काळ एकत्र काम करत होते. राजन यांची गव्हर्नरपदी निवड झाल्यानंतर बेकर यांनी राजन यांचे विशेष कौतुक केले होते. ‘रघू प्रत्येक काम सर्वोत्तमच करतो. मी जेव्हा जेव्हा त्याला भेटलो, तेव्हा एका अत्यंत ब्रिलियंट अशा अर्थतज्ज्ञाला भेटत असल्याचे मला जाणवले. ही नवी जबाबदारी तो यशस्वीरीत्या पार पाडेल.’, अशी प्रतिक्रिया बेकर यांनी राजन यांच्या नियुक्तीनंतर दिली होती.