News Flash

नोएडात मोकळ्या जागेत नमाज पठणाला बंदी; पोलीस अधीक्षकांकडून आदेश जारी

त्यासाठी पोलिसांनी नोएडातील सेक्टर ५८च्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना पत्र लिहून त्यांच्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून वाचण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांनी मोकळ्या जागेत नमाज पठण करण्यासाठी प्रतिबंधीत आदेश जाहीर केले आहेत. त्यासाठी पोलिसांनी नोएडातील सेक्टर ५८च्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना पत्र लिहून त्यांच्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून वाचण्याच्या सूचना दिल्या आहेत.


पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे की, मुस्लिम कर्मचाऱ्यांनी जुम्मेचे (शुक्रवार) नमाज पठण बागांसारख्या मोकळ्या जागेत करु नये. जर या आदेशाचे उल्लंघन करताना कोणी कर्मचारी आढळल्यास त्यासाठी त्याच्या कंपनीला जबाबदार धरले जाईल.

या आदेशाबाबत चर्चेसाठी येथील कंपन्यांनी नोएडाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बैठकीची मागणी केली आहे. पोलिसांच्या नोटीशीत म्हटले आहे की, सेक्टर ५८ मधील अथॉरिटी पार्कमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांसह शुक्रवारच्या नमाज पठणालाही परवानगी नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 1:47 pm

Web Title: noida police has ordered muslim employees to stop offering friday prayers in open areas
Next Stories
1 इराणच्या चाबहार बंदराचे भारताकडून संचालन सुरु
2 नागरी सेवा परिक्षेसाठी वयोमर्यादा कमी होणार नाही; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे स्पष्टीकरण
3 अखिलेश-मायावतीने मैत्रीचा ‘हात’ नाकारला तर काँग्रेसकडे प्लान बी
Just Now!
X