25 November 2020

News Flash

गर्लफ्रेंडच्या भावाची हत्या केल्याप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबरला अटक

कमल शर्माचा बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता.

(फोटो सौजन्य - निझामुल खान इन्स्टाग्राम)

प्रेयसीच्या भावाची हत्या केल्या प्रकरणी एका प्रसिद्ध युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. कमल शर्मा असे मृताचे नाव असून तो निठारीचा रहिवाशी आहे. २८ ऑक्टोबरला कामावरुन घरी परतत असताना कमल शर्माची गोळया झाडून हत्या करण्यात आली.

कमल शर्माचा बहिणीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. निझामुल खान असे मुख्य आरोपीचे नाव आहे. बाइक स्टंटच्या व्हिडीओसाठी प्रसिद्ध असणाऱ्या निझामुल खानच्या यु-ट्यूब चॅनलचे नऊ लाख सबस्क्राइबर आहेत. निझामुलचे कमलच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. पण कमलचा या प्रेमसंबंधांना विरोध होता.

कमलने आपल्या बहिणीकडून तिचा मोबाइल हिसकावून घेतला होता व निझामुलला मारहाण केली होती. त्यानंतर युट्यूबरने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. निझामुलच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 6:21 pm

Web Title: noida popular youtuber held for killing girlfriends brother who came in the way dmp 82
Next Stories
1 गुजरात पोटनिवडणूक: भाजपा कार्यकर्त्यांवर मतांसाठी पैसे वाटपाचा आरोप, चौकशीचे आदेश
2 नितीशकुमार यांच्या सभेत फेकण्यात आला दगड
3 ट्रम्प यांच्या विजयासाठी हिंदू सेनेतर्फे मंदिरात विशेष पूजा, होम
Just Now!
X