25 February 2021

News Flash

रक्षाबंधनसाठी माहेरी जाऊ दिले नाही, महिलेने केली आत्महत्या

रविवारी सकाळी रिनाने लोकेशला रक्षाबंधननिमित्त अलीगढला भावाच्या घरी जाऊया, असे सांगितले. मात्र, लोकेशने तिला नकार दिला.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

रक्षाबंधनासाठी माहेरी जाऊ न दिल्याने नोएडात एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.

नोएडात चरणदास गाव असून या गावात लोकेश आणि रिना (वय २७) हे दाम्पत्य राहत होते. या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी देखील आहे. २०१३ मध्ये अलीगढच्या रिनाचे लग्न बुलंदशहरमधील लोकेश याच्याशी झाले होते. लोकेशला नोएडातील कंपनीत नोकरी लागल्याने दोघेही चरणदास गावात राहू लागले.

रविवारी सकाळी रिनाने लोकेशला रक्षाबंधननिमित्त अलीगढला भावाच्या घरी जाऊया, असे सांगितले. मात्र, लोकेशने तिला नकार दिला. संध्याकाळी यावरुन दोघांमध्येही भांडण झाले. काही वेळाने लोकेश तिच्या मुलीला घेऊन फिरायला बाहेर निघून गेला. रात्री नऊ वाजता तो घरी परतला असता रिनाने आत्महत्या केल्याचे समोर आले. रिनाने गळफास घेत आत्महत्या केली होती. रिनाच्या कुटुंबीयांनी लोकेशविरोधात मानसिक व शारीरिक छळ तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत लोकेशला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:01 pm

Web Title: noida woman commits suicide after husband refused to go home for rakhi on rakshabandhan
Next Stories
1 हिंदू तरुणीचा ‘यू टर्न’, लग्नासाठी धर्मपरिवर्तन केलेल्या मुस्लिम तरुणाची साथ सोडली
2 Kerala Floods : पूरग्रस्तांसाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी गाणं गाऊन मागितली मदत
3 ‘निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर झाल्यास मतदान केंद्र बळकावण्याची भीती’
Just Now!
X