News Flash

“मुस्लिमेतरांना लक्ष्य करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चा वापर”, केरळमधील बिशपचा खळबळजनक आरोप!

गुरुवारी कॅथलिक बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट यांनी केरळमधील एका कार्यक्रमादरम्यान खळबळजनक आरोप केले आहेत

Palai bishop Joseph Kallarangatt
बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट हे कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगडमध्ये चर्चेच्या एका कार्यक्रमात बोलत होते (photo ani)

गुरुवारी कॅथलिक बिशप मार जोसेफ कल्लरंगट्टा यांनी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगडमध्ये चर्चे च्या एका जाहीर कार्यक्रमात खळबळजनक आरोप केला आहे. “जिहादींद्वारे केवळ ‘लव्ह जिहाद’ पसरवला जात नाही तर आता ‘नार्कोटिक जिहाद’ देखील पसरवला जात आहे. या लोकांना फक्त गैर मुस्लिमांना संपवायचे आहे,” असा आरोप जोसेफ कल्लारनगट्ट यांनी जिहादींवर लक्ष करतांना केला.

बिशप मार जोसेफ कल्लारनगट्ट म्हणाले की, “जे लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते फक्त वास्तवापासून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. याकडे फक्त प्रेमविवाह म्हणून पाहिले जाऊ नये. ही एक युद्धनीती आहे.”

जिहादींचा एकच उद्देश

“लव्ह जिहाद व्यतिरिक्त आता नार्कोटिक जिहाद देखील केरळमध्ये पसरत आहे. जिहादींना समजले आहे की, भारतासारख्या देशात कोणालाही शस्त्रास्त्रांनी संपवले जाऊ शकत नाही. या कारणास्तव, आता त्यांनी नवीन डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. या जिहादींचा एकच उद्देश आहे – त्यांचा धर्म वाढवणे आणि सर्व गैर मुस्लिमांना संपवणे. त्यांनी लव्ह जिहाद आणि नार्कोटिक जिहादचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.”, असे देखील जोसेफ कल्लारनगट्ट म्हणाले.

नार्कोटिक जिहाद म्हणजे काय

बिशप म्हणाले, “नार्कोटिक जिहाद म्हणजे गैर-मुस्लिमांना, विशेषत: तरुणांना, ड्रग्सचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य खराब करण्याची क्रिया आहे.” ते म्हणाले, “कट्टर जिहादींनी चालवलेल्या आइस्क्रीम पार्लर, हॉटेल्स आणि ज्यूस कॉर्नरमध्ये विविध प्रकारची ड्रग्स वापरली जात आहेत. ते गैर मुस्लिमांना बिघडवण्यासाठी विविध प्रकारची ड्रग्स शस्त्र म्हणून वापरत आहेत.”

केरळच्या जनतेने सावध राहण्याची गरज

“केरळमधील कॅथलिक मुली देखील प्रेम आणि नार्कोटिक जिहादच्या बळी ठरत आहेत. केरळमध्ये एक गट खूप सक्रिय झाला आहे. त्यांचे काम फक्त प्रेम आणि नार्कोटिक जिहाद पसरवणे आहे.” असे बिशप यांनी सांगितले. तसेच त्यांनी आवाहन केले की, “केरळच्या जनतेने आता अशा सर्व लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. जिहादी मानसिकता पसरवण्याची कोणालाही परवानगी दिली जाऊ शकत नाही.”

“अमली पदार्थांच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या रेव्ह पार्ट्या आणि अशा घटनांमधून जप्त करण्यात आलेली ड्रग्स ही आपल्यासमोर नार्कोटिक जिहादची वस्तुस्थिती मांडतात. मी अशा अनेक लोकांना पाहिले ज्यांनी ड्रग्सचं व्यसन लागल्यावर नोकरी गमावली किंवा अभ्यास सोडून दिला.” असे देखील बिशप म्हणाले.

बिशप यांच्या वक्तव्यामुळे विविध मुस्लिम संघटनांनी निषेध व्यक्त केला. केरळ सुन्नी स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य सरचिटणीस सतार पँथलूर म्हणाले की, “एका बिशपकडून असे वक्तव्य अनपेक्षित होते. त्यांनी या आरोपामागील पुरावे उघड करावेत”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 8:46 pm

Web Title: non muslims are targets of narcotic jihad kerala bishop srk 94
Next Stories
1 “त्यांना वाटायचं मी माणूस नसून काल्पनिक व्यक्ती आहे,” कधीकाळी वाँटेड असलेल्या तालिबानीने अमेरिकी फौजांना खिजवलं!
2 लसीकरणात भारताचा नवा उच्चांक! ७५ कोटींपर्यंत मारली मजल; WHO ने केले अभिनंदन
3 ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दरात किंचित घट; खाद्यतेलाच्या किंमती मात्र चढ्याच
Just Now!
X