News Flash

सामान्यांना पुन्हा झटका; सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सिलिडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ७७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता ६८१.५० रूपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६५१ रूपये मोजावे लागणार आहेत.

तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ११९ रूपयांची वाढ करण्यात आली असून आता दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरसाठी दिल्लीत १ हजार २०४ रूपये मोजावे लागणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात १९ किलोच्या सिलिंडरसाठी १ हजार ८५ रूपये मोजावे लागत होते. याव्यतिरिक्त पाच किलोच्या सिलिंडरच्या दरातही लाढ करण्यात आली असून ते आता २६४.५० रूपयांना मिळणार आहे. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

कोलकात्यामध्ये १४.२ किलोच्या विना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी ७०६ रूपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत यासाठी ६५१ रूपये मोजावे लागतील. चेन्नईत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ६९६ रूपये झाली आहे. तर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरसाठी (१९ किलो) १ हजार२०४, कोलकात्यात १ हजार २५८ रूपये तर मुंबईत १ हजार १५१ आणि दिल्लीत १ हजार ३१९ रूपये मोजावे लागणार आहेत.

यावेळी सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या बाजार भावात १०५ रूपयांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 12:09 pm

Web Title: non subsidies gas cylinder price hike continuous in third month jud 87
Next Stories
1 अभिमानास्पद…! मराठमोळे सतिश खंदारे लडाखचे पहिले पोलीस महासंचालक
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 गुडविनच्या मालकाच्या संपत्तीवर टाच; पोलिसांनी जप्त केल्या गाड्या आणि फ्लॅट
Just Now!
X