08 March 2021

News Flash

नव्या वर्षाचं गिफ्ट! विनाअनुदानित सिलिंडर १२० रुपये ५० पैसे स्वस्त

आज मध्यरात्रीपासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे

केंद्र सरकारने नव्या वर्षाचं पहिलं गिफ्ट जनतेला दिलं आहे. विनाअनुदानित सिलिंडर आता १२० रुपये ५० पैसे स्वस्त झाला आहे. तर अनुदानित सिलिंडर ५ रुपये ९१ पैसे स्वस्त झाला आहे. दर कपात झाल्याने अनुदानित सिलिंडर हा ५०० रुपये ९० पैशांऐवजी ४९४ रुपये ९९ पैशांना मिळणार आहे. एलपीजी गॅस सिलिंडरचे दर महिन्याभरात दुसऱ्यांदा कमी करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत १२० रुपये ५० पैशांनी कमी करण्यात आली आहे. IOC ने या संदर्भातली घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने ही कपात करण्यात आली आहे. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 8:13 pm

Web Title: non subsidised lpg cylinder price cut by rs 120 50 subsidised by rs 5 91
Next Stories
1 #NewYear2019 : आतषबाजीत न्युझिलंडमध्ये नववर्षाचे सर्वप्रथम स्वागत
2 सेल्फी काढण्याच्या नादात धबधब्यावरुन खाली पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
3 मोहन भागवतांच्या कार्यक्रमादरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी
Just Now!
X