विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात ३८ रूपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सोमवारी (दि.३१) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सध्या एका ग्राहकाला वर्षाला ९ अनुदानित सिलिंडर मिळतात. त्यामुळे दहावा सिलिंडर विकत घेताना दरवाढीचे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या दरानुसार सध्या दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलिंडर ५२९ रुपयाला मिळणार आहे. दरम्यान, याआधीस जुलै महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली होती. त्यावेळी सिलिंडरच्या किंमतीत ११ रुपयांची कपात करण्यात आली होती.

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील वाढ-घट विचारात घेऊन दर महिन्याला तेल कंपन्या पेट्रोल, डिझेल, सिलिंडर तसेच विमान इंधनाचे दर जाहीर करीत असतात.