उत्तर भारतीय समाज हा मुंबईचा कणा आहे असे वक्तव्य भाजपा खासदार पूनम महाजन यांनी केले आहे. मुंबईची प्रगती व्हावी यासाठी या समाजाने खूप कष्ट घेतले आहेत. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून या समाजाने खूप मेहनत केली आहे असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाने मुंबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांचं नात खूप जुनं आहे प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते असेही उदाहरण त्यांनी यावेळी दिले. उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कायमच टीका करत असतात. अशात आता भाजपा खासदार पूनम महाजन यांनी उत्तर भारतीय हे मुंबईचा कणा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 5:13 pm