अण्वस्त्र युध्द छेडण्याची गेला महिनाभर धमकी दिल्यानंतर उत्तर कोरियाने आपल्या भूमिकेत अचानक बदल करत आपला शत्रू अमेरिकेसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवत साऱया जगाला आश्चर्याचा धक्का दिला.
उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय संरक्षण आयोगाने एक पाऊल मागे येत अमेरिकेकडे चर्चेसाठी हात पुढे केला आहे. मात्र, उत्तर कोरियाचे सत्ताकेंद्र असलेल्या  नियामक मंडळाचे नेतृत्व करणारे नेते किम जोंग उन यांनी अमेरिकेला जशास तसे वागण्याची ताकीद दिली आहे. उत्तर कोरिया आपला महत्वकांक्षी अणु कार्यक्रम थांबवायला तयार आहे पण, अमेरिकेने देखील आपला अणु कार्यक्रम थांबवावा अशी चेतावणी किम यांनी दिली आहे.
चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यास मदत होईल असे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे.
अत्तर कोरियाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मिसाईल प्रक्षेपीत केले आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये अणु चाचणी घेतली होती. त्यामुळे उत्तर कोरियावर संयुकत्त राष्ट्र संघाकडून प्रतिबंध लादण्यात आले होते. या प्रतिबंधांवरून उत्तर कोरियाने आक्रमक होत अमेरिकेवर आगपाखड केली होती व अण्वस्त्र युध्द होण्याची जगासमोर भिती निर्माण झाली होती.
अमेरिकेला किम जोंग उन यांची मागणी मान्यकरणे अवघड जाणार आहे.