News Flash

आंतरखंडीय क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून चाचणी

उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.

| August 4, 2016 12:48 am

उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. जपानी सागराच्या दिशेने त्यांनी क्षेपणास्त्र सोडले, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. अमेरिकेने क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली बसवल्यामुळे उत्तर कोरियाने हे प्रक्षोभक कृत्य केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने लगेचच या वृत्ताला दुजोरा दिला असून, आम्ही आमचे व मित्र देशांचे आक्रमणापासून संरक्षण करण्यास सक्षम आहोत असे म्हटले आहे. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायती या महिन्यात नंतर होणार असून या आधीच्या कवायतीत अमेरिकेचे तीस हजार तर दक्षिण कोरियाचे ५० हजार सैनिक सहभागी झाले होते. उत्तर कोरियातील उनयुल शहरातून सकाळी ७.५० वाजता हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. क्षेपणास्त्र ६२१ मैल म्हणजे १००० किलोमीटर अंतर पार करून गेले, ते मध्यम पल्ल्याचे रोडाँग क्षेपणास्त्र होते असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकटानी यांनी सांगितले, की क्षेपणास्त्र टोकियोच्या आर्थिक क्षेत्र असलेल्या ठिकाणी पडावे या हेतूने सोडले होते. उत्तर किनाऱ्यावर ते सकाळी ८.०५ वाजता पडले असावे. उत्तर कोरियाने तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी १९ जुलैला केली असून उत्तर कोरियाने म्हटले आहे की, दक्षिण कोरियावर आण्विक हल्ल्याचे ते सादृश्यीकरण होते. संयुक्त राष्ट्रांनी अनेक र्निबध लादले असूनही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. अमेरिकेच्या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला उत्तर कोरियाने हे उत्तर दिले आहे. त्यांचे नेते किम जोंग उन यांनी त्यांचे वडील किम जोंग द्वितीय हे २०११ मध्ये निवर्तल्यानंतर देशाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी ३०० ते १००० कि.मी पल्ल्याची १६ स्कड क्षेपणास्त्रे, सहा रोडाँग क्षेपणास्त्रे, सहा मुसुदान क्षेपणास्त्रे (४००० कि.मी पल्ला), पाणबुडीवरची तीन क्षेपणास्त्रे यांच्या चाचण्या केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियाला आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञान वापरण्यास मनाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 12:48 am

Web Title: north korea fires ballistic missiles
Next Stories
1 काश्मीरमधील स्थितीबाबत लक्ष ठेवण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रांची अखेर माघार
2 मुस्लीम विधवा महिलेला १५ हजार रु. महिना मदत सत्र न्यायालयाकडून मंजूर
3 वेगमर्यादा ओलांडली तर या देशांत होते शिक्षा…
Just Now!
X